खिश्याला परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाला शाओमीचा स्मार्ट टिव्ही

शाओमीने मागील दिवसांपुर्वी 43 इंच एमआय टिव्ही ई43के लाँच केला होता. कंपनीने आता 32 इंचचा एमआय टिव्ही प्रो लाँच केला आहे. शाओमीच्या या 32 इंच टिव्ही ई32एसचे मॉडेल नंबर L32M6-ES आहे. एमआय टिव्ही प्रो सीरिज अंतर्गत हा टिव्ही लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या या टिव्हीची किमत 899 युआन (जवळपास 9,500) रुपये आहे. भारतात हा टिव्ही कधी लाँच होणार याची अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.

Image Credited – The Mobile Indian

शाओमीच्या 32 इंचच्या एमआय टिव्ही प्रो 32 इंचचा फूल-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जे शानदार व्ह्यूइंग एक्सपिरियंस देते. शाओमीच्या या टेलिव्हिजनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसोबत 1080 पिक्सलचे रिझॉल्यूशन देण्यात आलेले आहे. या टिव्हीच्या स्क्रीनमध्ये अल्ट्रा-हाय स्क्रीन टू बॉडी रेशियो देण्यात आला आहे. शाओमीचा हा टेलिव्हिजन बिल्ट इन XiaoAI वॉइस असिस्टेंट मिळते. यात 12-की ब्लूटूथ रिमोट कंट्रोल देण्यात आला आहे, जो वॉइस कंट्रोल सपोर्ट मिळतो.

Image Credited – Navbharat Times

एमआय स्मार्ट टिव्ही प्रो क्वॉड-कोर CPU ने सुसज्ज आहे. या स्मार्ट टिव्हीमध्ये में 1GB रॅम आणि 8GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. यात 6W चे 2 स्पीकर देण्यात आले आहे. याशिवाय ब्लूटूथ 4.0, 2.4GHz WiFi, पॅचवॉल आणि DTS डीकोडर देण्यात आला आहे. इंटरफेससाठी यात USB पोर्ट, 2 HDMI पोर्ट्स, एक AV इनपुट आणि एक एंटीना पोर्ट मिळेल.

Leave a Comment