कोरोना : डब्ल्यूएचओची हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनच्या क्लिनिक ट्रायलला तात्पुरती स्थगिती

जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षेच्या कारणांमुळे कोरोना व्हायरसवरील संभाव्य उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरिकिनच्या क्लिनिकल ट्रायलला तात्पुरती स्थगिती दिली आहे. संघटनेने मागील आठवड्यात लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनंतर हा निर्णय घेतला आहे. या रिपोर्टनुसार, या औषधाच्या सेवनामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची शक्यता वाढते. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस ग्रेब्रेस्येस यांनी ही माहिती दिली.

ट्रडोस यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये शेकडो हॉस्पिटल्स कोरोना व्हायरसचा उपचारासाठी रुग्णांवर ट्रायल करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हायड्रॉक्सीक्लोरिकिनच्या ट्रायलवर बंदी घालण्यात आली आहे. डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड या सेफ्टी डेटाचे पुनरावलोकन करेल. मात्र इतर ट्रायल सुरू राहतील.

Image credited – Northeast Now

हायड्रॉक्सीक्लोरिक्वीनचा प्रामुख्याने वापर संधिवातासाठी केला जातो. मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण देखील हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन घेत असल्याचे म्हटले होते. तसेच ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील कोरोनावरील उपचारासाठी हे औषध वापरण्यास सांगितले होते.

Image Credited – Science News

दुसरीकडे लँसेटच्या अभ्यासात आढळले की, हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन आणि क्लोरोक्वीन या दोन्ही औषधांचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तसेच त्यांना 96 हजार कोरोनारुग्णांचा अभ्यास केल्यानंतर या औषधांचा कोणताही फायदा होत नसल्याचे आढळले.

Leave a Comment