… तर विराट आणि मी शत्रू असतो – शोएब अख्तर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा मोजक्याच अशा फलंदाजांपैकी एक आहे जो जगातील कोणत्याही गोलंदाजाचा सहज सामना करू शकतो. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनुसार, विराट कोहलीने वसीम अक्रम, वकार यूनुस आणि शेन वॉर्न या महान गोलंदाजा विरुद्ध खेळताना नक्कीच आनंद लुटला असता. ईएसपीएनक्रिकइंफोच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अख्तर म्हणाला की, कदाचित विराट कोहली वसीम अक्रम, वकार यूनुस आणि शेन वॉर्न या सारख्या महान गोलदांजाविरुद्ध खेळला असता. त्याला देखील त्यांच्याविरुद्ध खेळायला नक्कीच आवडले असते.

Image Credited – The Indian Express

विराट कोहलचे कौतुक करत शोएब अख्तर म्हणाला की, जर ते एकमेकांसोबत खेळले असते तर ते नक्कीच चांगले मित्र असते. आम्ही दोघेही पंजाबी आहोत व आमचा स्वभाव देखील काहीसा समान आहे. त्याचे ह्रदय मोठे आहे. जरीही तो ज्यूनिअर असला तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे.

Image Credited – ThePrint

अख्तर पुढे म्हणाला की, आम्ही दोघे नक्कीच चांगले मित्र असतो. मात्र मैदानावर आम्ही एकमेकांचे कट्टर शत्रू असतो. मी नक्कीच त्याच्या डोक्यात काय चालले आहे, हे वाचू शकलो असतो व त्याला सांगितले असते की माझ्या गोलंदाजीवर कट अथवा पूल मारण्याची कोणतीही शक्यता नाही.

Leave a Comment