रिलायन्सप्रमाणे भारती एअरटेल देखील हिस्सेदारी विकून होणार कर्जमुक्त

रिलायन्स इंडस्ट्रीजने कर्जमुक्त होण्यासाठी काही दिवसांपुर्वीच 5 कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याची करार केला आहे. भारती एअरटेलला देखील कर्ज फेडण्यासाठी ही पद्धत आवडली असून, एअरटेलने देखील हिस्सेदारी विकून कर्जमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्सच्या मालकीचे जॅग्युआर लँडरोव्हरने कोरोना संकटाच्या काळात ब्रिटन सरकारकडे 1 अब्ज डॉलरची मदत पॅकेजची मागणी केली आहे. या बदल्यात कंपनी सरकारला आपली काही हिस्सेदारी देण्यास तयार आहे. मात्र अद्याप टाटा मोटर्सकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Image Credited – Moneycontrol

भारती एअरटेलची प्रमोटर भारती टेलिकॉम शेअर विकून 1 अब्ज डॉलर जमवण्याची योजन बनवत आहे. कंपनी 558 रुपये प्रति शेअर दराने 2.75 टक्के हिस्सेदारी विकणार आहे.  15 कोटी शेअरच्या व्यवहारासाठी ब्लॉक डील जवळपास 14 अब्ज डॉलर असेल. यामुळे कंपनीला कर्जमुक्त होण्यास मदत होईल. भारती एअरटेलमध्ये भारती टेलिकॉमची 41 टक्के हिस्सेदारी आहे. तर भारती टेलिकॉममध्ये सुनील भारती आणि त्यांच्या कुटुंबाची 52 टक्के हिस्सेदारी आहे.

Image Credited – Moneycontrol

दरम्यान, एका महिन्याच्या आता रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये फेसबुक इंक, जनरल अटलांटिक, सिल्वर लेक आणि विस्टा इक्विटी यांनी गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment