अडचणीच्या काळात सोशल मीडिया फायदेशीर ठरत असल्याचे अनेक घटनेत समोर आलेले आहे. नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यापासून ते एखाद्या सामाजिक गोष्टी भाष्य करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्यास सोशल मीडिया महत्त्वाचा ठरतो. सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना ट्विटरमुळे एका लहान मुलाला आपल्या कुटुंबाकडे जाण्यास मदत मिळाली आहे.
नेटिझन्सच्या मदतीमुळे झाली लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 12 वर्षांच्या मुलाची आपल्या पालकांशी भेट
आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की कशाप्रकारे काही ट्विटर युजर्सने दिल्लीत अडकलेल्या एका 12 वर्षीय स्थलांतरित मुलाला मदत केली.
ट्विटर का जादू। एक लघु कथा
दिल्ली के एक मजदूर परिवार को लॉकडाउन से पहले अपने घर बिहार जाना पड़ा। जाते समय अपने 12 साल के बच्चे को एक रिश्तेदार के घर छोड़ गए। पर उन्होंने कुछ ही दिन में उसे निकाल दिया। रहने की और कोई जगह थी नहीं इसलिए बच्चा द्वारका के एक पार्क में रहने लगा। pic.twitter.com/ldLiLB64ET
— Arun Bothra (@arunbothra) May 23, 2020
बोथरा यांनी ट्विटमध्ये सांगितले की, दिल्लीतील एका कामगार कुटुंबाला लॉकडाऊनच्या आधी आपल्या घरी बिहारला जावे लागले. ते काही दिवसात परतणार होते, मात्र लॉकडाऊन सुरू झाले. नातेवाईकांनी देखील मुलाला काही दिवसांनी घरातून काढले. राहण्यासाठी कोणतेही ठिकाण नसल्याने तो द्वारका येथील पार्कमध्ये राहू लागला.
@Sanjay97odisha ने परिवार को पटना पहुंचाने का बंदोबस्त किया। @indiacares ने टिकट का प्रबंध किया। परिवार आज सुबह दिल्ली पहुंच कर अपने बच्चे से पार्क में मिला।@umashankarsingh ने हिंदी ट्वीट के लिए आग्रह किया। मुझसे पहले @NiteshJoshi22 ने अनुवाद करके भेज दिया। यानी जादू पर जादू। pic.twitter.com/7ba7vnGrfu
— Arun Bothra (@arunbothra) May 23, 2020
योगिता नावाची महिला येथे भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना, त्यांनी या मुलाला पाहिले. त्यांनी मुलाला अनेक दिवस जेवण दिले. अखेर एकेदिवशी स्नेहा नावाच्या महिलेने मुलाबाबत ट्विट करत त्याची समस्तीपूर येथील पालकांशी भेट घडवून द्यावी असे म्हटले.
या ट्विटनंतर अनेक ट्विटर युजर्स मदतीसाठी पुढे आले. रेल्वे तिकिटांची व्यवस्था करत मुलाच्या पालकांना पटनावरून दिल्ली आणण्यात आले. जेथे त्यांची मुलाशी भेट झाली.