मध्य प्रदेश, राजस्थाननंतर पाकिस्तानची टोळधाड आता महाराष्ट्रावर, अनेक राज्यांना सावध राहण्याचा इशारा

देशातील अनेक भागांमध्ये सध्या टोळ (locust) किड्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील 4 ते 5 गावांना या हल्ल्याचा सामना करावा लागत असून, हे टोळ वनस्पती आणि पिकांना नुकसान पोहचवतात. या किटकांपासून वाचविण्यासाठी जिल्हा आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी पिकांवर रसायनांची फवारणी करण्यास सांगितले आहे.

कृषि विभागाचे सहसंचालक रविंद्र भोसले यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्याद्वारे या किटकांनी राज्यात प्रवेश केला. यानंतर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात या किटकांच्या झुंडीने प्रवेश केला आहे. हे किडे रात्री प्रवास करत नाही. तर दिवसा वारा ज्या दिशेने वाहतो तसा प्रवास करतात.

Image Credited – New Indian Express

पाकिस्तानातून 11 एप्रिलला राजस्थानमध्ये या किड्यांनी प्रवेश केला होता. उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्हा प्रशासनाने या किटकांचा सामना करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. प्रशासनाने 200 लीटर क्लोरोपायरीफॉसचा साठा करून ठेवला असून, विक्रेत्यांना देखील जिल्ह्याच्या बाहेर केमिकलची विक्री करण्यास मनाई केली आहे.

Image Credited – Quartz

पर्यावरण मंत्रालयाने या किड्यांबाबत राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांना सावध केले होते. दिल्लीला देखील सावध राहण्यास सांगितले आहे.

Leave a Comment