एलआयसीने पुन्हा सुरू केली बंद झालेली सरकारची ही योजना, मिळणार 12 हजार रुपये पेंशन

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान वय वंदन योजना सुरू केली होती. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंतच होता. मात्र भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) पुन्हा एकदा ही योजना सुरू केली आहे. आता या योजनेत व्याज दर, गुंतवणूक आणि पेंशनच्या रक्कमेसह अनेक बदल करण्यात आलेले आहेत.

एलआयसी अंतर्गत येणाऱ्या या योजनेत पेंशन म्हणून 12 हजार रुपये मिळू शकतात. आता ही योजना 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. वयाच्या 60 वर्षानंतर व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये पेंशनसाठी 1.56 लाख रुपये आणि महिन्याला 1 हजार रुपये पेंशनसाठी 1.62 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

पेंशनधारकाला एक निश्चित तारीख, बँक अकाउंट आणि कालावधी निवडू शकतात. तुम्हाला ज्या तारखेला पेंशन हवी आहे, त्या तारखेची निवड करावी. याशिवाय मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेंशनची देखील पेंशनधारक निवड करू शकतात. गुंतवणुकीनंतर एक वर्षाने पेंशन मिळण्यास सुरूवात होते.

Image Credited – Zee News

ऑफलाईन अथवा एलआयसीच्या वेबसाईटद्वारे या योजनेचा भाग होत येईल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 10 वर्ष आहे. पहिल्या वर्षी 7.40 टक्के रिटर्न मिळेल.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी 022-67819281, 022-67819290 अथवा 1800-227-717 या नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय [email protected] या ईमेल आयडीद्वारे योजनेचा फायदा जाणून घेता येईल.

Leave a Comment