भारतीय वंशाचे राजीव जोशी ‘इनव्हेंटर ऑफ द ईयर’ पुरस्कारने सन्मानित

मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन इनव्हेंटर राजीव जोशी यांचा प्रतिष्ठित इनव्हेंटर ऑफ द ईयर पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला आधुनिक करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये केलेल्या कामासाठी मिळाला आहे. डॉ. जोंशी यांच्या नावावर 250 पेशा अधिक शोधांचे पेटेंट आहेत. सध्या ते न्यूयॉर्कमध्ये आयबीएम थॉमसन वॉटसन रिसर्च सेंटरमध्ये काम करतात. या महिन्याच्या सुरूवातीला व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात त्यांना न्यूयॉर्क इंटॅलेक्च्युल प्रोपर्टी लॉ असोसिएशनने पुरस्कारने सन्मानित केले.

डॉ. जोशी यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेले आहे. याशिवाय त्यांनी मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून एमएस पदवी आणि कोलंबिया यूनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली आहे.

त्यांच्या शोधामध्ये स्केलिंगसाठी इंटरकनेक्ट स्ट्रक्चर्स आणि प्रोसेस, भविष्यातील अपयश, हाय बँडविथ, हाय परफॉर्मेंस आणि लो पॉवर इंटरग्रेटडे सर्किट्ससाठी मशीन लर्निंग टेक्निक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी मेमरीज-हार्डवेअर एस्सेलेटर्स या गोष्टींचा समावेश आहे. यातील अनेक गोष्टी प्रोसेसर्स, सुपर कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये उपलब्ध आहे.

डॉ. जोशी यांनी सांगितले की, लहानपणी त्यांचे आई-वडील त्यांना गुगलिएल्मो मार्कोनी, मॅडम क्यूरी, राइट ब्रदर्स, जेम्स वॉट, अलेक्झेंडर बेल, थॉमस एडिसन अशा अनेक महान वैज्ञानिकांच्या कथा सांगत असे. त्यांच्या यशाच्या कथांनी आणि शोधांनी विचार करण्याच्या क्षमतेला आकार दिला व विज्ञान-टेक्नोलॉजीमध्ये रुची वाढवली.

Leave a Comment