काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना संकट आणि लॉकडाऊनवरून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. न्याय योजनेचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की सरकारचा विचार आहे की गरिबांना रोख रक्कम दिल्यास, आपल्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम करेल. प्रवाशांमध्ये निराशेची भावना आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.
क्रेडिट रेटिंगमुळे प्रवाशांना रोख रक्कम देत नाही सरकार, राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी म्हणाले की, भारताला गंभीर बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रमांचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. एमएसएमई आणि गरिबांना रोख रक्कमेची गरज आहे, अन्यथा हे धोकादायक असेल. कोरोना संकटाचा सामना करताना सरकार पारदर्शी नाही.
सरकार काही गोष्टी सांगत नाही. देशाला माहिती हवे की काय घडत आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारला सांगितले होते की कोरोनामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मी पुन्हा सांगतो की आपण आताही धोकादायक स्थितीमध्ये आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.
ते म्हणाले की, आर्थिक आघाडीवर सकारात्मक काम करण्याची मी सरकारला विनंती करतो. सरकारने जाहीर केलेले पॅकेज कोणाच्याही उपयोगी पडणार नाही. जर आपण गरिबांना रोख रक्कम दिली तर त्याचा आपल्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होईल, असा सरकार विचार करत आहे.