कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अर्थव्यवस्थेला याचा फटका बसत असला तरी, पर्यावरण आणि जीव-जंतूवर देखील याचा परिणाम होत आहे. लॉकडाऊनचे फायदे असले तरी एक धक्कादायक बाब आता समोर आली आहे. स्पेनमधील एका बेटावर लॉकडाऊनमुळे मच्छरांचा आकार 4 पट वाढला आहे. सोबतच मच्छर, किड्यांची संख्या देखील वाढली आहे.
बापरे ! लॉकडाऊनमुळे येथील मच्छर 4 पटीने धुष्टपुष्ट झाले
स्पेनच्या इबिजा बेटावर मच्छरांचा आकार व संख्या एवढी वाढली आहे की सरकारचे लक्ष आता कोरोनावरून त्यांच्याकडे गेले आहे. मच्छरांचा आकार वाढल्याने आरोग्य कर्मचारी देखील हैराण आहेत. सोबतच येथे एक खतरनाक मच्छर पोहचला आहे.
लॉकडाऊनमुळे हॉटेल्सचे स्विमिंग पूल खराब झाले आहेत. यामुळे मच्छारांचा आकार व संख्या वाढत गेली. ज्या घरांमध्ये कोणीही राहत नव्हते, तेथेही असेच झाले आहे. पर्यटन स्थळ असल्याने येथे हॉटेल्सची संख्या अधिक आहे. हॉटेल्समधील स्विमिंग पूल्स लॉकडाऊनमुळे बंद असल्याने मच्छरांनी यालाच आपले घर बनवले.
इबिजा प्रशासन मच्छरांना नष्ट करण्यासाठी काम करत आहे. येथे धोकादायक एशियन टायगर मच्छर देखील आढळला आहे. इबिजा काउसिंल एनवॉयरमेंट मॅनजमेंट डिपार्टमेंटने लोकांना स्विमिंग पूल स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या लोकांना देखील प्रशासन स्विमिंग पूल स्वच्छ करण्यास सांगत आहे. खाजगी पूल प्रशासन स्वच्छ करू शकत नाही.