गैरसमज; स्पायडर मॅन बनण्यासाठी या 3 मुलांनी चक्क कोळ्याला घेऊ दिला चावा

जगभरात सुपर हिरो स्पायडर  मॅनचे लाखो चाहते आहेत. त्याच्या सारखे बनण्याचे अनेकांचे स्वप्न देखील असते. मात्र कितीही झाले तरी स्पायडरमॅन ही काल्पनिक कथा आहे. असे असले तरी बोलिवियामधील तीन भावांनी स्पायडर मॅन बनण्यासाठी चक्क कोळीला चावा घेऊन दिल्याची माहिती समोर आली आहे.

या तिन्ही मुलांचे वय 8 ते 12 वर्ष आहे. बकऱ्यांना चरायला घेऊन गेले असताना, या मुलांनी हा कारनामा केला. कोळी चावल्याने ही तिन्ही जोरजोरात रडू लागली. त्यांच्या आईने त्यांना पाहिल्यानंतर त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले.

Image Credited – nypost

कोळी चावल्याने तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक होती. तिघांनाही ताप, स्नायूमध्ये वेदना जाणवत होत्या. दुसऱ्याच दिवशी मुलांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रांसफर करण्यात आले. येथे उपचारानंतर एक आठवड्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

स्थानिक अधिकारी व्हर्जिलिओ पिइट्रो यांनी सांगितले की, मुलांनी विचार केला की स्पायडर मॅन सारखी शक्ती मिळेल. मात्र हे धोकादायक ठरले. कोळीचे विष हे सापा एवढेच विषारी असते.

Leave a Comment