लॉकडाऊन वाढीमुळे निर्माण होऊ शकते आरोग्य व्यवस्थेवर मोठे संकट – महिंद्रा

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केवळ आर्थिदृष्ट्याच धोकादायक नाहीतर, यामुळे वैद्यकीय संकट देखील निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, लॉकडाऊन वाढवल्यामुळे फक्त अर्थव्यवस्थेचेच नुकसान नाहीतर, सोबतच वैद्यकीय संकट देखील निर्माण करेल. आपल्या ट्विटमध्ये एक लेख जोडत त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत आह व कोरोनासोडून इतर रुग्णांकडे दुर्लेक्ष करणे महागात पडू शकते.

ते म्हणाले की, धोरण ठरविणाऱ्यांसाठी हा निर्णय घेणे सोपा नाही. मात्र लॉकडाऊन वाढवल्याने काहीही मदत होणार नाही. कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढतच जाणार असून वेगाने अधिकाधिक फिल्ड हॉस्पिटल बेड्ससह ऑक्सिजनची व्यवस्था करायला हवी. सैन्याला याचा अधिक अनुभव आहे.

याआधी देखील आनंद महिंद्रांनी लॉकडाऊन अधिक काळ वाढवल्यास अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल, असे म्हटले होते.

Leave a Comment