ओला पाठोपाठ उबरने केली 600 कर्मचाऱ्यांची कपात

ओला पाठोपाठ आता कॅब कंपनी उबरने देखील भारतातील 600 कर्मचाऱ्यांन कामावरून काढून टाकले आहे. उबर इंडियाचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन म्हणाले की, कोव्हिड-19 च्या संकटामुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्या व्यतिरिक्त कंपनीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. चालक, रायडर सपोर्ट व इतर भागातील जवळपास 600 पुर्णवेळ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

Image Credited – Free Press Journal

त्यांनी सांगितले की, प्रत्येक कर्मचाऱ्याला पुढील 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल. 6 महिने आरोग्य विमा आणि नोकरी मिळविण्यासाठी मदत केली जाईल.

Image Credited – The Economic Times

2 महिन्यात 95 टक्के उत्पन्न कमी झाल्याने मागील आठवड्यात ओलाने देखील 1400 कर्मचाऱ्यांची कपात केली होती.  देशभरात कॅब सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात ही कामगार कपात करण्यात झाली आहे.

Leave a Comment