बहुप्रतिक्षित दमदार एसयूव्ही ‘स्कोडा कारोक’ भारतात लाँच

स्कोडाने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही 2020 स्कोडा कारोकला (Skoda Karoq) अखेर भारतात लाँच केले आहे. या नवीन एसयूव्हीची किंमत कंपनीने 24.99 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवली आहे. कारोक एसयूव्ही भारतात सीबीयू यूनिट म्हणून लाँच करण्यात आली असून, भारतात याचे एकच टॉप व्हेरिएंट मिळेल. ग्लोबल मार्केटमध्ये मागील वर्षी ही एसयूव्ही लाँच झाली होती. नवीन स्कोडा कारोक मॅजिक ब्लॅक, लावा ब्लू, बिलियंट सिल्वर, केंडी व्हाईट, मॅग्नेटिक ब्राउन आणि क्वार्टज ग्रे रंगात उपलब्ध असेल.

Image Credited – NDTV

नवीन कारोकच्या लूकबद्दल सांगायचे तर ही एसयूव्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कंपनीच्या बाकी मॉर्डन कारप्रमाणेच आहे. ज्यात समोर समान फॅमिली ग्रील आणि पातळ एलईडी हॅडलॅम्प्स देण्यात आलेले आहेत. कारचा पुढील भाग आकर्षक असून, मागील भाग स्कोडा कोडिअक प्रमाणे आहे.

Image Credited – NDTV

कारच्या कॅबिनला लेदर अपहोस्ट्रीने सजवण्यात आले आहे. यात अ‍ॅपल कारप्ले आणि अ‍ॅड्रॉइड ऑटो सपोर्ट असणारे 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम व्हर्च्युअल कॉकपिट, 9 एयरबॅग्स आणि ड्युअल-झोन क्लाइमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि रियर एसी वेंट्स सारखे फीचर्स मिळतील. याशिवाय कारसोबत पार्क ट्रॉनिक सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एबीएससोबत ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल असे अनेक अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

Image Credited – News18

स्कोडा कारोक कॉम्पॅक्ट एसयूव्हीसोबत 1.5 लीटरचे 4-सिलेंडर टीएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. यासोबत 7-स्पीड डीसीजी गिअरबॉक्स मिळेल. हे इंजिन 148 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की एसयूव्ही अवघ्या 9 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 202 किमी आहे.

Leave a Comment