पाकिस्तानात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, आता पाकच्या मदतीसाठी अमेरिका पुढे आला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला कोरोनाच्या लढाईत 60 लाख डॉलर (जवळपास 45 कोटी रुपये) देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान आर्थिकरित्या देखील कमकुवत झाला असून, देशाला वाचविण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी सार्वजनिकरित्या अनेक देशांकडे मदत मागितली आहे.
कोरोनासाठी लढायला अमेरिकेने कर्जबाजारी पाकिस्तानला केली 45 कोटींची मदत
पाकिस्तानात अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स हे व्हिडीओ संदेशाबाबत म्हणाले की, कोरोनाच्या व्हायरसच्या रुग्णांसाठी दिवस-रात्र हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल. याद्वारे आरोग्य केंद्रामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल.

जोन्स म्हणाले की, संक्रमित भागात राहणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी मोबाईल प्रयोगशाळा बनवल्या जातील. त्यांनी नागरिकांना ईद-उल फितरच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला असून, 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.