ट्विटरच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर ओढले ताशेरे


प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढले असून गृहमंत्रालयावर टीका करताना जावेद अख्तर म्हणाले की, संपूर्ण देश कोरोनाविरोधातील लढाई लढत असताना आपले गृह मंत्रालय सुधारित नागरिकत्व कायदाविरोधी (सीएए) आंदोलन केलेल्यांना अटक करण्यात व्यस्त आहे,

कोरोना आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी, गरिबी या कोरोनापासून निर्माण झालेल्या समस्यांशी आपला देश झुंज देत असताना सुधारित नागरिकत्व कायदाविरोधात (सीएए) आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आपले गृह मंत्रालय व्यस्त असून उर्वरित भारतापेक्षा वेगळी त्यांची प्राधान्यता असल्याचे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जावेद अख्तर यांनी टोला लगावला आहे.


अमित शहा यांच्यावर याआधी संगीतकार-गायक विशाल दादलानीनेही निशाणा साधला होता. तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, कोरोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शहा अजूनही शांत कसे आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला होता.

Leave a Comment