चीनची स्मार्टफोन कंपनी रेडमीने आपला नवीन स्मार्टफोन रेडमी के30आय (Redmi K30i) 5जी लाँच केला आहे. डिझाईन आणि लूकमध्ये हा स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झालेल्या रेडमी के30 सारखाच आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा आणि 2 सेल्फी कॅमेरे देण्यात आलेले आहेत. याशिवाय यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल.
6 कॅमेरे असणारा रेडमीचा ‘के30आय’ 5जी स्मार्टफोन लाँच
Image Credited – Gizmochina6 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फूल एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले ड्यूल पंच-होल डिझाईनसोबत येतो. यात स्नॅपड्रॅगन 765जी एसओसी जी प्रोसेसर मिळेल. हा फोन अँड्राईड 10 वर आधारित एमआययूआय 11 आउट ऑफ द बॉक्स ओएसवर चालतो.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तर अन्य कॅमेऱ्यांमध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सल सुपर मॅक्रो यूनिट आणि 2 मेगापिक्सल डेप्थ यूनिट कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहे. फोनमध्ये 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500 एमएएच बॅटरी मिळते.

कंपनीने फोन सध्या केवळ चीनमध्ये लाँच केला असून, चीनमध्ये फोनची किंमत 1999 युआन (जवळपास 21,300 रुपये) आहे. 2 जून पासून फोनची विक्री सुरू होईल. भारतात हा फोन कधी लाँच होईल याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात कंपनी रेडमी के30आय 5जी स्मार्टफोनला भारतात लाँच करू शकते.