रियलमीचा पहिला वहिला स्मार्ट टिव्ही भारतात लाँच

दीर्घप्रतिक्षेनंतर अखेर स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला पहिला स्मार्ट टिव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने रियलमी स्मार्ट टिव्हीला 32 इंच आणि 43 इंच या दोन साईजमध्ये उपलब्ध केले आहे. या टिव्ही सोबतच रियलमीने स्मार्ट टिव्ही सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे.

रियलमी स्मार्ट टिव्हीच्या 32 इंच व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आणि 43 इंच व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. कंपनीची वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर 2 जूनपासून टिव्हीची विक्री सुरू होईल. ऑफलाईन स्टोर्समध्ये देखील लवकरच टिव्ही उपलब्ध होईल.

Image Credited – BGR India

32 इंच रियलमी स्मार्ट टिव्ही 1366×768 पिक्सल (एचडी-रेडी) रिजॉल्यूशन आणि 43 इंच व्हेरिएंट 1920×1080 पिक्सल (फुल-एचडी) रिजॉल्यूशनसोबत येईल. स्क्रीन साइज आणि रिजॉल्यूशन व्यतिरिक्त दोन्ही व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन आणि फीचर एकसारखेच आहेत. हे स्मार्ट टिव्ही अँड्राईड टिव्ही 9 पायवर चालतात. यात युजर्सला अँड्राईड टिव्हीचे गुगल प्ले स्टोर वापरता येईल. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि यूट्यूब टिव्हीमध्ये आधीच इंस्टॉल असेल.

Image Credited – beebom

रियलमी स्मार्ट टिव्हीमध्ये 400 नीट्स पिक ब्राइटनेस, एचडीआर 10 स्टँडर्ड सपोर्ट, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळेल. यात मीडियाटेक एमएसडी6683 प्रोसेसर देण्यात आले आहे. टिव्हीमध्ये 4 स्पीकर सिस्टमसोबत 24 वॉट रेटेड साउंड आउटपूट मिळते. यात डॉल्बी ऑडिओ आणि ब्लूटूथ 5.0 सपोर्ट मिळेल.

Loading RSS Feed

Leave a Comment