ईदच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा


नवी दिल्ली – रमजान ईदच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद निमित्त मोदींनी लिहिलेल्या शुभेच्छा संदेशात मी रमजान ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधनांना शुभेच्छा देतो. ईदच्या निमित्ताने करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकजण निरोगी रहावे आणि सगळ्यांचीच भरभराट व्हावी, असे म्हटले आहे.

राज्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतीही गर्दी होणारे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक विधी घरीच केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुस्लिम बांधवांना घरात बसूनच आजचा रमजान साजरा करावा लागत आहे. ईदनंतर गल्ली, मोहल्ल्यांमध्ये गर्दी करु नका. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवरुनच नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्या, असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment