न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये सोमवारी सकाळी 5.6 तीव्रतेचे भुकंपाचे धक्के बसले. मात्र या स्थितही एका टिव्ही चॅनेलला मुलाखत देणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न या जराही हलल्या नाहीत. त्यांनी सयंम आपली मुलाखत सुरूच ठेवली व मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मध्येच थांबवत राजधानी वेलिंग्टन परिसरात काय घडत आहे, याची माहिती दिली. न्यूझीलंड पोलिसांनुसार या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही व त्सुनामीचीही शक्यता नाही.
भूकंप आला तरी घाबरल्या नाहीत न्यूझीलंडच्या पंतप्रधान, सुरू ठेवली मुलाखत

भुकंपाच्या झटके बसत असताना पंतप्रधान जेसिंडा या संसदेच्या बिल्डिंगमध्ये मुलाखत देत होत्या. मुलाखती दरम्यानच त्यांनी पत्रकाराला सांगितले की, रयान येथे भुकंप आला आहे. याचे झटके जाणवत आहेत. आजुबाजूच्या गोष्टी देखील हलत आहेत. असे म्हणत त्यांनी मुलाखत सुरू ठेवली.
यानंतर त्या म्हणाल्या की, भूकंप थांबला आहे. आता कोणताही धोका नाही. मला वाटत आहे की मी एका मजबूत बिल्डिंगमध्ये आहे.
न्यूझीलंड प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’मध्ये स्थित आहे. येथे वर्षाला 15 हजारांपेक्षा अधिक भूकंप येतात. मात्र त्यातील काहीच जाणवतात.