जगभरातील काही देशांनी काल ईद साजरी केली. तर आज भारतात ईद साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम या सणावर पाहण्यास मिळत आहे. नमाज पठण करतानाही लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत आहेत. असेच काही ईद साजरी करतानाचे जगभरातील फोटो पाहुयात.
जगभरात कोरोनाने बदलली ईद साजरी करण्याची पद्धत, पहा फोटो

इस्तांबुलच्या या मशीदीमध्ये ईदच्या निमित्ताने हजारो लोक येत असे. मात्र यावर्षी मशीद सुनसान आहे. मोजकेच लोक नमाज पठण करत आहेत.

हा फोटो पाकिस्तानच्या लाहौर येथील बादशाही मशीदचा आहे. येथे लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत नमाज पठण करत आहेत.

कुआलालंपूर येथील एका डॉक्टराने व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबातील सदस्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सकाळी नाश्ता केला व पुन्हा कामास सुरूवात केली. त्यांच्यासाठी यंदाची ईद अगदी साधी आहे.

काश्मिरमध्ये रविवारी ईद साजरी केली. लोकांनी सोशल डिस्टेंसिंग पाळत मैदानात नमाज अदा केली. तर काहीजणांना घरातच राहावे लागले.

श्रीनगर येथे एकत्र येत लोकांनी नमाज पठण केले.

श्रीलंकेत लॉकडाऊन असल्यामुळे कोलंबो येथील एका कुटुंबाने घरातच ईदच्या निमित्ताने नमाज पठण केले.

कोलंबोमध्ये कर्फ्यू असल्याने लोक घरातच कैद आहेत. अशात ईद असतानाही सर्वत्र शांतता आहे.

रशियाच्या ग्रांझी येथे लोकांना मशीदमध्ये जाऊन नमाज पठण करण्यास परवानगी मिळाली. येथे नमाज पठण करताना लोकांनी मास्क लावले होते.