हॅकर्सपासून सावधान, असे ओळखा बनावट वेबसाईट आणि ई-मेल

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र सायबर सेलने देखील माँट ब्लँक सारख्या कंपनीकडून येणाऱ्या मेसेज अथवा ईमेलवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. माँट ब्लँक ही प्रसिद्ध पेन कंपनी आहे. मात्र हॅकर्स या कंपनीच्या नावाखाली फसवणूक करत आहे. काही गोष्टींद्वारे तुम्ही फेक मेसेज अथवा ई-मेल सहज ओळखू शकतो.

शब्दांवर लक्ष द्या –

कोणत्याही वेबसाईट अथवा ईमेलवर क्लिक करण्याआधी त्यावरील शब्दांची स्पेलिंग चेक करावी. सर्वसाधारणपणे ई-मेल अथवा साईटवर शब्दांची स्पेलिंग चुकीची असते. सोबतच व्याकरण देखील चुकीचे असते.

हॅकर्स प्रसिद्ध कंपनीच्या नावाचा करतात गैरवापर –

हॅकर्स जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांचे नाव वापरून लोकांची फसवणूक करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला अशा कोणत्याही कंपनीकडून ई-मेल अथवा मेसेज आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करू नका.

यूआरएल तपासा –

बनावट वेबसाईट आणि ई-मेल ओळखण्याची आणखी एक पद्धत आहे. कोणत्याही ई-मेलला उघडण्याआधी त्यावर माउस न्यावा. त्यानंतर तुम्हाला पॉपअपमध्ये यूआरएल आणि हायपरलिंक दिसेल. याद्वारे तुम्ही बनावट वेबसाईट ओळखू शकता.

खाजगी माहिती शेअर करू नका –

सायबर गुन्हेगार कंपन्यांचे नाव वापरून ई-मेल अथवा मेसेज पाठवत असतात. अशा स्थितीत सावध राहावे व त्यांना पासवर्ड, खाजगी माहिती, डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता.

Leave a Comment