तुमचा स्मार्टफोन स्लो चार्ज होण्याची असू शकतात ही 5 कारणे

स्मार्टफोन चार्जिंगची पद्धत आधीच्या तुलनेत आता खूप बदलली आहे. स्मार्टफोन कंपन्या फास्ट चार्ज टेक्नोलॉजीसह स्मार्टफोन लाँच करत आहे. अधिकांश फोन दीड ते दोन तासात पुर्ण चार्ज होतात. जर तुमचा स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी या पेक्षा अधिक वेळ घेत असल्यास चिंता करण्याचे काहीही कारण नाही. आज तुम्हाला काही कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन स्लो चार्ज होत असेल.

खराब अडॅप्टर अथवा केबल –

अनेकदा असे होते की फोनमध्ये कोणतीही समस्या नसते, तर चार्जरमध्ये समस्या असते. त्यामुळे फोनसोबत येणाऱ्या मूळ अडॅप्टरद्वारेच फोन चार्ज करण्यास सांगितले जाते. फोनसोबत मिळणारा चार्जर खराब झाल्यास ऑरिजनल चार्जर खरेदी करावा. बाहेर चांगल्या दिसणाऱ्या केबलमध्ये आतून समस्या असल्यामुळे देखील फोन स्लो चार्ज होता. अशा स्थितीत चार्जर बदलावा.

पॉवर सोर्स –

स्लो चार्जिंगसाठी कमजोर पॉवर सोर्स देखील कारणीभूत असू शकतो. जर तुम्ही वायरलेस चार्जरचा वापर करत असाल, तर वायर असणाऱ्या चार्जरचा वापर करा.

बॅकग्राउंड अ‍ॅप –

फोनच्या सॉफ्टवेअरमधील समस्येमुळे देखील फोन स्लो चार्ज होऊ शकतो. जर तुम्ही नवीन अ‍ॅप डाऊनलोड केला असेल, तर त्वरित डिलीट करा. कारण हा अ‍ॅप बॅकग्राउंडमध्ये हा अ‍ॅप जास्त पॉवर वापरत असण्याची शक्यता आहे.

डॅमेज यूएसबी पोर्ट –

तुमच्या फोनचे यूएसबी पोर्ट फोन स्लो चार्ज होण्याचे कारण असू शकते. अनेक महिने फोन वापरल्यानंतर पोर्टमध्ये घाण जमू शकते, अथवा आतून खराब होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये पोर्ट स्वच्छ करावे अथवा बदलावे.

खराब बॅटरी –

वरील सर्व उपाय वापरल्यानंतरही जर तुमचा फोन लवकर चार्ज होत नसल्यास तुम्हाला बॅटरी बदलण्याची गरज आहे. अनेकदा बॅटरी काम करत असते, मात्र आतील समस्येमुळे हळू चार्ज होते. त्यामुळे बॅटरी बदलून ही समस्या सोडवू शकता.

Leave a Comment