रामदास आठवलेंच्या कवितेद्वारे ईदच्या हटके शुभेच्छा


मुंबई : रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव उपवास करतात आणि रमजान महिन्याच्या अखेरीस ईद येते. संपूर्ण जगात ही ईद रमजान ईद म्हणून साजरी केली जाते. भारतात पवित्र रमजान ईद हा सण एकता ; बंधुत्व; शांतता प्रेम वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून साजरा होतो. यावेळी सर्व धर्मीय मुस्लिम बांधवाना गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. पण यंदा जगासह देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आजचा हा सण मुस्लिम बांधव अत्यंत साधेपणाने साजरा करत आहेत. त्यातच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेत्यांनी या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या सर्वांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभेच्छा हटके ठरल्या आहेत. आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देताना कोरोना को हाराना है ये हमारा है ब्रिद,आज आई है मुस्लीम समाज की रमजान ईद, असे म्हणत या रमजान ईदला कोरोनाचा प्रादुर्भाव संपविण्याचा आपण निर्धार करूया असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचबरोबर यंदा कोरोनाच्या संकटामुळे नमाज पठण घरीच करावे; घरी राहून गर्दी न करता रमजान ईदचा उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Comment