कोरोना : सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवत मुला-मुलींनी केली पूल पार्टी

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचा पालन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकजण कोणतेही नियम न पाळता चक्क पार्टी करत आहेत. अशाच एका पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ अमेरिकेतील सेंट्रल मिसौरी येथील असून, येथे लेक ऑफ द ओजार्कमध्ये लोक विना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग न पाळता पूल पार्टी करत आहेत. पार्टीमध्ये लोक एकमेंकाना अलिंगन देत आहेत, डान्स करत आहेत.

ज्या शहरामध्ये ही पार्टी सुरू आहे.  तेथे कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजारांच्या पुढे आहे. तर 600 पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ही पार्टी मेमोरियल डे वीकेंडच्या दिवशी करण्यात आली. या दिवशी अमेरिकेत मृत सैनिकांसाठी हा दिवस पाळला जातो.

Leave a Comment