चीनी ड्रॅगनची पुन्हा वळवळ, भारतीय सीमेवर नजर ठेवण्यासाठी तयार केला गुप्तहेर हॅलिकॉप्टर

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभुमीवर चीनने आता पहिल्या मानवरहित हॅलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. हे हॅलिकॉप्टर पठार भागात हेरगिरी करेल. चीनच्या मीडियाने दावा केला आहे की, या अत्याधुनिक मानवरहित हॅलिकॉप्टरला भारताच्या सीमेवर तैनात केले जाईल. जेणेकरून चीन सीमेवर कोणालाही न समजता नजर ठेवू शकेल.

Image Credited – Aajtak

या मानवरहित हॅलिकॉप्टरचे नाव AR500C आहे. याला चीनची सरकारी कंपनी एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने (एव्हीआयसी) बनवले आहे. कंपनीने पुर्व चीनच्या जियांसी प्रांतात याचे पहिल्यांदा उड्डाण घेतले.

Image Credited – Aajtak

चीनची वेबसाईट ग्लोबल टाईम्सनुसार, या मानवरहित हॅलिकॉप्टरचा उपयोग भारत-चीन सीमच्या भागात नजर ठेवण्यासाठी केला जाईल. याचा हेरगिरीसाठी वापर केला जाईल. यात शस्त्र लावल्यास हॅलिकॉप्टर हल्ला करू शकते. कार्गो डिलिव्हरी देखील करू शकते. हे हॅलिकॉप्टर शत्रूला टार्गेट करू शकते व अणू-रासायनिक लीकेजची माहिती देऊ शकते.

Image Credited – Aajtak

हे हॅलिकॉप्टर 6700 मीटर उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकते. याचा टॉप स्पीड ताशी 170 किमी व वजन 500 किलो आहे.  एव्हीआयसीचे टेक्नोलॉजी डायरेक्टर आणि हॅलिकॉप्टरची निर्मिती करणारे वैज्ञानिक फँग योंगहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हॅलिकॉप्टर पुर्णपणे डिजिटल आहे. हे आपोआप टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. याची उड्डाण चाचणी यशस्वी झाली असून, यात चीनचे सर्वात अत्याधुनिक आणि पॉवरफूल इंजिन देण्यात आले आहे.

Leave a Comment