जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आता कोरोना व्हायरस अशा भागात आणि जंगलात पसरला आहे जेथे लोक देखील जाणे टाळतात. कोरोना व्हायरस ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात देखील पसरला असून, येथील आदीवासी लोकांना याची लागण झाली आहे. अॅमेझॉन जंगल भागातील 980 आदिवासी लोकांना कोरोनाची लागण झाली असून, 125 लोकांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक ! अॅमेझॉनच्या जंगलात देखील पोहचला कोरोना
या भागावर लक्ष ठेवणाऱ्या ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागामध्ये आरोग्याच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत. येथे संसर्ग वेगाने पसरू शकतो. या जंगलातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 12.6 टक्के आहे. तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण 6.4 टक्के आहे.
अॅमेझॉनमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्या मुलाचे वय 15 वर्ष होते. येथे 9 लाख विविध जमातीचे लोक राहतात. हे आदिवासी लोक बाहेरील व्यक्तीला आत येऊ देत नाहीत. त्यामुळे येथे कोरोनाचा प्रसार कसा झाला ? याचा शोध ब्राझील सरकार घेत आहे. 90 टक्के आदिवासी समुदायांच्या गावापासून आयसीयू असणारे हॉस्पिटल 320 किमी लांब आहे. 10 टक्के गावांपासून हे अंतर 700 ते 1100 किमी आहे.