इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारखे नवीन फीचर आले आहे. नवीन कॉन्टॅक्ट नंबर अॅड करण्यासाठी आता नंबर टाईप अथवा सेव्ह करण्याची गरज नाही. केवळ क्यूआर कोड स्कॅनकरून नवीन कॉन्टॅक्ट अॅड करता येणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर अँड्राईड आणि आयओएसच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे. लवकरच स्टँडर्ड व्हर्जनमध्ये हे फीचर रोल आउट केले जाणार आहे.
व्हॉट्सअॅपमधील क्यूआर कोड फीचरमुळे तुमचे काम होणार सोप्पे
या फीचर अंतर्गत व्हॉट्सअॅप युजर्सचे कॉन्टॅक्ट क्यूआर कोड स्वरूपात दिसतील. क्यूआर कोडमध्ये तुमचा नंबर लपलेला असतो. नवीन नंबर व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करायचा असेल, तेव्हा तुम्हाला केवळ समोरच्या युजर्सचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
बीटा व्हर्जनमध्ये क्यूआर कोडचा पर्याय व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये देण्यात आलेला आहे. सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलच्या बाजुलाच क्यूआर कोड ऑनलाईन दिसेल.