देशातील दोन तृतियांश जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगची एकही लॅब नाही

देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली असून, सरकार अधिकाधिक टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये प्रवासी कामगार घरी परतत असल्याने तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. मात्र या राज्यांमध्ये टेस्टिंगची सुविधा खूप कमी आहे. देशातील दोन तृतियांश जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना टेस्टिंग लॅब नसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

देशात कोरोना टेस्टिंगसाठी आयसीएमआरकडून मान्यता मिळालेल्या 607 लॅब आहेत. यात 427 सरकारी आणि 180 खाजगी लॅब आहेत. देशातील 736 जिल्ह्यांपैकी जवळपास 486 जिल्ह्यांमध्ये टेस्टिंगची सुविधा नाही. विविध राज्यात टेस्टिंग सेंटरसाठी आयसीएमआरकडे 50 अर्ज प्रलंबित आहेत. परंतु कोरोना टेस्टिंग लॅबचा दर्जा मिळण्यासाठी ते अटी पूर्ण करत नाहीत. यासाठी लॅबकडे बायो सेफ्टी कॅबिनेटसोबत कॅलिब्रेटेड आणि फुली फंक्शनल टेस्टिंग मशीन, एक कोल्ड सेंट्रीफ्यूज, आरएनए एक्ट्रॅक्शन किट, वेस्टलास्टरलाइज करण्यासाठी ऑटोक्लेव, अनुभवी कर्मचारी आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट पॉलिसी आवश्यक आहे. अधिकांश सेंटरमध्ये अनुभवी कर्मचारी नाहीत.

मे महिन्यात आतापर्यंत 281 नवीन लॅबला परवानगी देण्यात आली आहे. यातील 194 लॅब कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडु, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगानामध्ये आहे. देशातील 318 लॅब केवळ 6 राज्यांमध्येच आहेत. यात दिल्ली – 32, गुजरात – 37, कर्नाटक – 57, महाराष्ट्र – 72, तमिलनाडु – 68 आणि आंध्रप्रदेशमध्ये 52 लॅब आहेत. तर उत्तर प्रदेश – 27, बिहार -16 आणि ओडिशामध्ये केवळ 17 लॅब आहेत.

Leave a Comment