सैनिकांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे भारतीय लष्कराकडून खंडन


नवी दिल्ली – चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारतासोबत सुरु असलेला सामीवाद आणखीनच पेटवण्याचा घाट चीनकडून घालण्यात येत आहे. मागील दोन आठवड्यात गॅल्व्हान व्हॅलीमध्ये चीन सैनिकांनी तंबू ठोकले आहेत. त्याचबरोबर त्यात वाढ करण्याच्या देखील तयारीत चीन आहे. दरम्यान भारताविरोधात चीनकडून घेतल्या जाणाऱ्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक देशांच्या तसेच नागरिकांच्या भुवया उंचवत आहेत. दरम्यान चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त देखील काही माध्यमांमध्ये झळकले होते. पण आता त्यावर भारतीय लष्कराकडून खुलासा करण्यात आला आहे. भारतीय सैनिकांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे लष्कराने खंडन केले आहे.

दरम्यान लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शुक्रवारी लेहमधील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली होती आणि एलएसीवरील विवादस्पद जागेसह संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. या आठवडयाच्या सुरुवातीला लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली होती.

Leave a Comment