एलॉन मस्क रचणार इतिहास, स्पेस एक्स बनणार हे करणारी पहिली खाजगी कंपनी

एलॉन मस्क यांची अंतराळ कंपनी स्पेस एक्स लवकरच इतिहास रचणार आहे. येत्या बुधवारी स्पेस एक्स नासाच्या दोन अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहे. अमेरिकेतून 9 वर्षात क्रू असलेले हे पहिलेच उड्डाण असेल. सरकार ऐवजी खाजगी कंपनी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षी होण्यासाठी स्वतः अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्लोरिडा येथील कॅनडी स्पेस सेंटरमध्ये उपस्थित असतील.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांना लाँचचे प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीमद्वारे पाहण्यास सांगण्यात आले आहे. क्रू ड्रॅगनला फाल्कन 9 रॉकेटद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या दिशेने लाँच केले जाईल.

अमेरिकेने अंतराळवीरांना अंतराळात पोहचविण्यासाठी खाजगी अंतराळ यान विकसित करण्याच्या उद्देशाने नासाने कमर्शियल क्रू कार्यक्रमाची सुरूवात केली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात याची सुरूवात झाली होती.

Leave a Comment