काही दिवसांपुर्वी फेसबुक आणि अनअॅकेडमी युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा कोट्यावधी भारतीय युजर्सचा डेटा डार्क वेबवर उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सायबर फर्म सायबलने माहिती दिली आहे. सायबलच्या रिपोर्टनुसार, नोकरी शोधणाऱ्या 2.9 कोटी भारतीय युवकांची खाजगी माहिती डार्क वेबवर उपलब्ध आहे. खास गोष्ट म्हणजे या डेटासाठी कोणतीही किंमत लावण्यात आलेली नाही. डार्क वेबवर हा डेटा मोफत उपलब्ध आहे.
नोकरी शोधणाऱ्या 2.9 कोटी भारतीयांचा डेटा डार्क वेबवर लीक
लीक झालेल्या डेटामध्ये शैक्षणिक योग्यता, पत्ता, मोबाईल नंबर अशा माहितीचा समावेश आहे. हा डेटा भारतातील सर्वात मोठ्या जॉब सर्च कंपनीच्या वेबसाईटवरून लीक झाला आहे. कंपनी याबाबत तपास करत असून, डेटा लीक युजर्सच्या रिझ्यूमद्वारे झाला आहे.
दरम्यान, याआधी सायबलने 26 कोटी युजर्सचा डेटा अवघ्या 41,600 रुपयांमध्ये डार्क वेबवर विकला जात असल्याची माहिती दिली होती. याशिवाय काही दिवसांपुर्वीच अनअॅकेडमीच्या 2.2 कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचे म्हटले होते.