सोनू सूद प्रमाणेच हे बॉलिवूड कलाकार देखील पडद्यामागे राहून करतात चॅरिटी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी मदत करत आहे. त्याच्या या कार्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला. अनेक कलाकार असे आहेत, जे चॅरिटी करत असतात मात्र याबाबत खूप कमी जणांना माहिती असते.

Image Credited – navbharattimes

राहुल बोस –

अभिनेता राहुल बोस अनेक संस्थांशी जोडलेला आहे. 2004 च्या त्सुनामीमध्ये त्याने अंडमान आणि निकोबार येथे मदत केली होती.

Image Credited – navbharattimes

जॉन अब्राहम –

अभिनेता जॉन अब्राहम पेटा आणि हॅबिटाट फॉर ह्युमॅनिटी या संस्थांशी जोडलेला आहे. त्यांने निधी जमवून अनेकांसाठी घराची व्यवस्था केली आहे.

Image Credited – navbharattimes

नाना पाटेकर –

नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशन तर्फे अनेक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी आपल्या कमाईच्या 90 टक्के रक्कम दान केल्याचे सांगितले जाते.

Image Credited – navbharattimes

शबाना आझमी –

शबाना आझमी यांनी लॉकडाऊनच्या काळात गरजू लोकांपर्यंत रेशन पोहचवले. याशिवाय त्यांचे एक एनजीओ लोकांना सशक्त बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करते. याशिवाय गरजूंसाठी शाळा-कॉलेज, कॉम्प्युटर सेंटर, शिवणकाम आणि भरतकामाचे केंद्र देखील चालवतात.

Image Credited – navbharattimes

दीया मिर्झा –

अभिनेत्री दीया मिर्झा पेटा, क्राय, कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन या संस्थेशी जोडलेली आहे. तिने लखनऊच्या प्राणीसंग्रहालयातून बिबट्याच्या दोन पिल्लांना दत्तक घेतले आहे.

Leave a Comment