सावधान ! प्लाझ्माच्या नावाखाली होत आहे फसवणूक

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या उपचारासासाठी अँटीबॉडी असलेले ब्लड प्लाझ्मा ऑनलाईन घेणे महागात पडू शकते. सायबर गुन्हेगार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा विकण्याची ऑफर देत फसवणूक करत आहे. सायबर गुन्हेगार प्लाझ्मा संदर्भात खोटी माहिती पसरवून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र सायबर पोलीसचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांच्यानुसार, सायबर गुन्हेगारांकडून प्लाझ्माला चमत्कारी उपचार सांगून, डार्क नेटवर ऑनलाईन जाहिराती दिल्या जात आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांची टीम या संदर्भात तपास करत आहे आणि असे दावे करणाऱ्यांचे स्क्रीन शॉट देखील मिळवले आहेत.

त्यांनी सांगितले की, डार्क नेटवरील साइट्स इंटरनेटच्या कक्षेतच अनलिस्टेड आणि सिक्रेट नेटवर्कवर चालतात. सायबर पोलीस असा हालचालींवर लक्ष ठेवत आहे. सोबतच सोशल मीडियावर आक्षेपार्ह कंटेट आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर देखील लक्ष ठेवत आहे. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबर पोलीस ऑनलाईन आक्षेपार्ह कंटेट टाकणाऱ्यांना सीआरपीसी कलम 149 अंतर्गत नोटीस जारी केली जात आहे.

Leave a Comment