कोरोना इफेक्ट : 377 टक्क्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी सर्चमध्ये वाढ

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत. आयटी, टेक्नोलॉजी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे घरून काम करण्याची सवय झाली आहे.

एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत देशात रिमोट वर्क (बाहेरून ऑफिसचे काम) असणाऱ्या नोकऱ्यांच्या सर्चमध्ये 377 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की लोक घरून काम करण्यासाठी इच्छुक आहेत. जॉब साइट इंडिडच्या रिपोर्टनुसार सर्च दरम्यान रिमोट, वर्क फ्रॉम होम आणि या प्रकारच्या शब्दांचे प्रमाण वाढले आहे.

इंडिड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशि कुमार म्हणाले की, कोरोनामुळे लोकांची काम करण्याची पद्धत बदलली आहे. रिमोट वर्कचा लोक शोध घेत आहेत व पुढेही हे जारी राहण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी अशा प्रकारचा रोजगार निर्माण करण्याकडे लक्ष द्यायला हवे.

Leave a Comment