सोशल मीडियात व्हायरल होत आहे ‘कोरोना स्पेशल खाखरा’


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशव्यापी लागूडाऊन सुरु असल्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग ठप्प पडले आहेत. त्याचबरोबर देशातील बहुसंख्य नागरिक हे घरातच अडकून पडले आहेत. या दरम्यान आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासोबतच आपल्या जिभेचे चोचले देखील पुरवत आहेत. अशा कठिण परिस्थितीत काहीजण आपली उपजीविका चालविण्यासाठी काही ना काही उद्योग करत आहेत. त्यातच आता सोशल माडियावर सध्या कोरोना स्पेशल खाखरा व्हायरल होत आहे.

आजवर आपल्यापैकी अनेकांनी साधा खाखरा, मेथी खाखरा, टोमॅटो खाखरा, मॅगी मसाला खाखरा, पाणीपुरी मसाला खाखरा अशा वेगवेगळ्या चवीच्या खाखऱ्याची चव चाखली असेल. पण कोरोना स्पेशल खाखऱ्याची चव तुम्ही चाखली नसेल. पण हा खाखरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे आणि हा खाखरा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ व्हायरस इन्फेक्शला दूर ठेवतात, असा दावा करत या खाखऱ्याची मार्केटिंग करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या खाखऱ्याचा पॅकेटचा फोटो व्हायरल होताच, त्यावर युजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अशाच पद्धतीने इतर व्यावसायिक देखील कोरोनाच्या कठिण परिस्थितीत आपल्या व्यवसायासाठी मार्ग शोधत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेळगावातील एका सोनाराने एका लग्नासाठी चक्क नवरदेवासाठी चक्क चांदीचा मास्क तयार केल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही अटींना शिथील करण्यात आल्या असून लग्न सोहळ्यांना काही अटींनुसार परवानगी देण्यात आली. यामध्ये मास्क घालणे बंधनकारक असल्यामुळे आता कोरोना लॉकडाऊनमधील या लग्नसोहळ्यात वधू–वरांसाठी खास चांदीचा मास्क तयार करण्यात आला होता.

Leave a Comment