उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांच्या मोबाईल वापरावर बंदी

कोरोना व्हायरसच्या लढाईत आता उत्तर प्रदेश सरकारने एल-2 आणि एल-3 च्या कोव्हिड-19 हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात महासंचालक (वैद्यकीय शिक्षण) केके गुप्ता यांनी सर्व मेडिकल कॉलेज आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. केके गुप्ता यांच्या आदेशानंतर राज्यातील कोव्हिड-19 साठी समर्पित असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

केके गुप्ता यांच्यानुसार, मोबाईलद्वारे संसर्ग पसरतो. कोरोना वार्डमध्ये आता हॉस्पिटलच्या वॉर्ड इंचार्जजवळ 2 मोबाईल फोन असतील. या फोनद्वारेच रुग्ण आपल्या नातेवाईंकाशी बोलू शकतील.

केके गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, कोरोनाग्रस्त व्यक्ती नातेवाईक अथवा इतर कोणाशी बोलण्यासाठी वॉर्ड इंचार्जकडे असलेल्या आलेल्या दोन फोनचा वापर करू शकतात. या फोनसाठी देखील इंफेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोलचे पालन करणे आवश्यक असेल. वॉर्ड इंचार्जकडे ठेवण्यात आलेल्या दोन फोनचे मोबाईल नंबर रुग्णाचे नातेवाईक आणि आरोग्य संचालनालयला देण्यात यावेत. जेणेकरून गरज पडल्यास वेळोवेळी रुग्णाशी बोलता येईल.

Leave a Comment