भाजप मंत्र्याने लाँच केली मोदींचे गुणगान करणारी आरती


देहरादून – देशासह अनेक राज्य सध्या कोरोना सारख्या महामारीचा एकीकडे सामना करत असताना दूसरीकडे देशात राजकीय क्षेत्रात डोक्यावरुन जाईल असे काही तर्कट प्रकार घडत आहेत. त्याचे जीवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. उत्तराखंडमधील सत्ताधारी भाजप सरकारच्या एका मंत्र्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी एक आरतीच लॉन्च केली आहे. सध्या सोशल मीडियावरील लोकांसाठी ही आरती चर्चेचा विषय बनली आहे. पण उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गरिमा दसौनी यांनी मंत्र्याच्या या कार्यावर चांगलीच फिरकी घेतली आहे.


गरिमा म्हणाले की, संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्याने अपमान झाला आहे. मोदी एक माणूस आहेत आणि त्यांना देवी-देवतांच्या श्रेणीत स्थान दिले जाऊ शकत नाही. मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात, असा आरोप केला.

तसेच काँग्रेसवर जे लोक घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्याकडे या प्रकरणाची दखल घेऊन त्या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी गरिमा यांनी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस भवनात निदर्शने केली. महिला कॉंग्रेसने नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Leave a Comment