आंबे खाण्याचे फायदेच फायदे


चोहोबाजूंनी रणरणता उन्हाळा, घामाच्या धारा आणि कितीही पाणी प्याले तरी न भागणारी तहान, अंगाची काहिली यामुळे अवघे देशवासी हैराण झाले आहेत मात्र या साऱ्या त्रासांवर मात करून उन्हाळाही सुसह्य बनविणारा एक खास दरवळ हवेत पसरतो आहे. हा दरवळ आहे फळांचा राजा मानल्या गेलेल्या आंब्याचा. नुसता वास आला तरी जिभेवर ज्याचा स्वाद अपोआप येतो आणि तोंडाला पाणी सुटते असा हा आंबा बहुगुणी म्हणून ओळखला जातो. या आंब्याचे आणखीही काही गुण आहेत जे सर्वाना माहिती नाहीत. ते कोणते हे पाहू.

आंबा खूप स्वादिष्ट फळ आहे पण त्यात फॅट म्हणजे स्निग्धांश नाहीत. ही माहिती वजनदार लोकांसाठी फार महत्वाची आहे. आंबे जास्त खाल्याने वजन वाढते हा गैरसमज आहे. त्यामुळे मन भरेपर्यंत आंबे खायला हरकत नाही. आंब्यात सोडियम आणि कोलेस्ट्रोलही नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनाही त्याचे सेवन करता येते. अर्थात आंब्यात कॅलरीज भरपूर आहेत.१०० ग्राम आंबा खाल्ला तर त्यातून ६० कॅलरी मिळतात असे सांगतात.


आंबा थोडा कच्चा असतो तेव्हा त्यात सी व्हिटामिन भरपूर असते पण आंबा पिवळा होऊन पिकला कि त्यात ए व्हिटामिन वाढते. सकाळी आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या रोजच्या सी व्हिटामिनची गरज त्यातून भागते तसेच रोज आवश्यक असलेल्या ए व्हिटामिनपैकी ३५ टक्के, तंतू ४४ टक्के गरज आंबा भागवितो.

आंबा हे जगभरात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे मात्र हापूस आंबा भारताची खासियत आहे. आंब्याची झाडे १०० फुटांपर्यंत वाढतात आणि ३०० वर्षे जुनी झाडे काही ठिकाणी आजही पाहायला मिलालात. हि झाडे अजूनही फळे देतात.

Leave a Comment