विरोधी पक्ष नेत्यांनो नुसती चर्चा करण्यापेक्षा आता रस्त्यावर उतरा – यशवंत सिन्हा

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी लॉकडाऊनमधील गरीब आणि कामगारांच्या स्थितीवरून सरकारवर टीका करण्यासोबतच विरोधी पक्षांना देखील सल्ला दिला आहे. माजी भाजप नेते असलेले सिन्हा यांनी ट्विट केले की, देशातील स्थलांतरित कामगार आणि गरीबांच्या स्थितीबाबत सरकार बहिरे आणि आंधळे झाले असल्याने विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरायला हवे. याचिका आणि स्टेटमेंटबाजीमुळे देशातील गरीब लोकांची मदत होणार नाही.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महामारी आणि कामगारांच्या संकटाविषयी चर्चा करण्यासाठी 22 विरोधी पक्षांची बैठक बोलवली होती. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी सिन्हा यांनी अशाप्रकारचे ट्विट केले आहे.

सिन्हा यांनी सरकारवर टीका करत ट्विट केले की, विरोधी पक्षांनी याचिका दाखल करण्याऐवजी रस्त्यावर उतरायला हवे. सरकार हे गरीबांच्या प्रती बहिरे आणि आंधळे झाले आहे. केवळ स्टेटमेंटबाजी आता पर्याप्त नाही.

या आठवड्याच्या सुरूवातीला यशवंत सिन्हा यांना दिल्ली पोलिसांनी राजघाटवर आंदोलन केल्यानंतर अटक केले होते. त्यांची मागणी होती की स्थलांतरित कामगारांना घरी पोहचविण्यासाठी सशस्त्र दलांची मदत घ्यावी.

Leave a Comment