1 सेंकदात 1000 चित्रपट डाऊनलोड, इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम

अवघ्या 1 सेंकदामध्ये 1000 एचडी चित्रपट डाऊनलोड करणे भविष्यात शक्य होणार आहे. जगभरातील सर्व विक्रम तोडत ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांना जो इंटरनेट स्पीड मिळाला आहे, तो टेराबाइट प्रति सेंकद (टीबीपीएस) आहे. हा इंटरनेट स्पीड एवढा वेगवान आहे की, याद्वारे केवळ 1 मिनिटात 42 हजार जीबी पेक्षा अधिक डेटा डाऊनलोड करता येईल. नवीन विश्वविक्रम 44.2 टीबीपीएसचा आहे. या स्पीडमध्ये युजर एका सेंकदात 1 हजारांपेक्षा अधिक चित्रपट डाऊनलोड करू शकतात.

कॉम्प्युटरवर मिळणाऱ्या डेटा स्पीडमध्ये 1 मेगाबाइटमध्ये 10 लाख युनिट्स डिजिटल इंफॉर्मेशन असते. चांगल्या ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे 100एमबीपीएस टॉप स्पीड मिळतो. म्हणजेच एका सेंकदात 100एमबी डेटा रिसिव्ह होतो. मोबाईल डेटा अथवा व्हायरलेस कनेक्शनमध्ये हा स्पीड 1एमबीपीएस पेक्षा कमी असतो. मात्र जो स्पीड संशोधकांना मिळाला आहे, त्यात 1 टेराबाइटमध्ये 1000 अब्ज यूनिट डिजिटल इंफॉर्मेशन असते.

टेराबाइट प्रति सेकंद इंटरनेट स्पीड मिळाल्यास, 1 सेंकदात 1000जीबी डेटा डाउनलोड करणे शक्य आहे. संशोधकांना 44.2 टीबीपीएस स्पीड मिळाला. म्हणजेच संशोधकांनी एका सेंकदामध्ये 44,200 जीबी डेटा डाऊनलोड केला. थोडक्यात सांगायचे तर या स्पीडमध्ये 512 जीबी स्टोरेज असणारे 86 पेक्षा अधिक आणि 256 जीबी स्टोरेज असणारे 172 स्मार्टफोन्सचे स्टोरेज फूल करता येईल. असे करण्यास केवळ 1 सेंकद लागेल.

संशोधकांनी हा विक्रम मायक्रो-कॉम्ब नावाच्या एका सिंगल चीपच्या मदतीने केला आहे. जे सध्याच्या टेलिकॉम हार्डवेयरच्या 80 लेयर्सला केवळा एका छोट्या चीपद्वारे बदलू शकते. मायक्रो कॉम्बला मेलबर्नच्या यूनिव्हर्सिटी कॅम्पसेजला जोडणाऱ्या नेटवर्कमध्ये लावण्यात आले होते.  तज्ञांचे म्हणणे आहे की याद्वारे होम-वर्किंग, स्ट्रिमिंग आणि सोशलाइजिंगची मागणी वाढवता येईल.

Leave a Comment