चीनच्या 33 कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार अमेरिका


वॉशिंग्टन – कोरोनाला जबाबदार असल्याचा वारंवार चीनवर आरोप करणाऱ्या अमेरिकेने अखेर वचपा काढण्यास सुरुवात केल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण चीनच्या 33 कंपन्या आणि काही संस्थांना इकोनॉमिक ब्लॅकलिस्टेड करण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. त्यानुसार आता मानवाधिकार उल्लंघन करणाऱ्या आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या चीनच्या 33 कंपन्या ब्लॅकलिस्टेड करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेने चीनवर कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत सातत्याने आरोप केले आहे. चीनच्या वुहान शहरात असलेल्या लॅबमधून कोरोनाचा उगम झाला असे अमेरिकेने म्हटले आहे. पण आतापर्यंत या सर्व आरोपाचे चीनने खंडण केले आहे. संपूर्ण जगावर चीनमुळे कोरोनाचे संकट ओढवले असून आता चीनला धडा शिकवण्याच्या हेतूने अमेरिकेत मोठी पाऊले उचलली जात आहे.

आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसची 52 लाखाहून अधिक लोकांना बाधा झाली आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाची 16 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहे. तसेच कोरोनामुळे 96 हजाराहून अधिक लोकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे.

Leave a Comment