व्हिडीओ : तुम्ही पाहिला आहे का चित्रकार उंदीर?

एका उंदराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. हा कोणताही साधासुधा उंदीर नसून, श्रीमंत उंदीर आहे. या उंदराची खास गोष्ट म्हणजे हा आपल्या पायाने पेंटिंग करतो व त्या पेंटिंगद्वारे पैसे कमवतो. या उंदराच्या पेंटिगची जगभरात विक्री केली जात आहे. या उंदराने बनवलेल्या पेंटिंगची किंमत 1000 पाउंड्स म्हणजेच जवळपास 92 हजार आहे.

उंदीरचे नाव गस असून, जेव्हा या उंदराच्या मालकाने त्याच्या कलेबद्दल समजले, तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी केमिकल नसलेले रंग आणि मिनी कॅनवास खरेदी केला. जेणेकरून त्याला पेटिंग करता येईल. या उंदराच्या पेंटिंग खरेदी करणाऱ्यांमध्ये दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया सारख्या देशातील नागरिकांचा समावेश आहे.

या उंदराच्या मालकाकडे आणखी 4 उंदीर आहेत. या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Comment