भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढत होत चालली असली तरी देखील लवकर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या अभ्यासात समोर आला आहे. लॉकडाऊनच्या आधी कोरोनाच्या प्रसाराचा जो वेग होता, तो लॉकडाऊनमध्ये कमी होऊन एक तृतियांश झाला.
लॉकडाऊनमुळे भारतात कोरोनाचा प्रसार 60% घटला – Study
25 मार्चला जेव्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, त्यावेळी भारतात 500 कोरोनाग्रस्त होते. तर 18 मे ला लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर हा आकडा 1 लाखांच्या पार गेला आहे. मात्र व्हायरस रिप्रोडक्शन रेटचे (R0) विश्लेषण वेगळेच काही सांगते. R0 द्वारे समजते की एका व्यक्तीद्वारे किती व्यक्ती संक्रमित झाले.
यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासात समोर आले की, 24 मार्चला लॉकडाऊन लागू होण्याच्या आधी R0 3.36 होते. म्हणजेच एक संक्रमित व्यक्ती 3 पेक्षा अधिक सामान्य व्यक्तींना संक्रमित करत होता. लॉकडाउन 1.0 च्या अखेर 14 एप्रिलला R0 1.71 वर आला. 3 मे ला जेव्हा लॉकडाउन 2.0 समाप्त झाला, तेव्हा हा रेट कमी होऊन 1.46 वर आला. 16 मे ला हा रेट आणखी कमी होऊन 1.27 झाला. म्हणजेच लॉकडाऊनमध्ये व्हायरसचा रिप्रोडक्शन रेट एक तृतियांशवर आला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या आणखी एका अभ्यासानुसार, लॉकडाऊनमुळे भारतात 20 लाख प्रकरण आणि 54 हजार जणांचा मृत्यू रोखता आला. मात्र R0 अद्यापही 1 पेक्षा वरती आहे. म्हणजेच व्हायरसचे आताही संक्रमण होऊ शकते.
यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ महामारी विज्ञानचे प्रोफेसर भ्रमर मुखर्जी यांच्यानुसार, R0 ला यूनिटी (1 मूल्य) वर आणले पाहिजे. ट्रिपल टी सिद्धांत म्हणजेच टेस्ट, ट्रेस अँड ट्रीटला लक्षणांच्या ट्रॅकिंगसाठी खास रणनिती, रँडम टेस्टिंग आणि टारगेटेड टेस्टिंग केले पाहिजे. राज्यांनुसार R0 वेगळा असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.