कोरोना व्हायरसमुळे लोक घरात राहून नवनवीन कला आत्मसात करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटी सोशल मीडियावर अनेक खास व्हिडीओ शेअर करत असतात. आता मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी आपला एक गिटार वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी गिटारवर वाजविले हे भन्नाट गाणे, नेटिझन्सकडून मिळाली दाद
मेघालयात कोरोनाच्या लढाईत सर्वात पुढे असणारे संगमा यांनी आयर्न मेडन बँडच्या ‘समवेअर इन टाईम’ या 1986 च्या अल्बमधील ‘वेस्टेट इयर्स’ गाणे गिटारवर वाजवतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, तीन दिवसांच्या व्यस्त विधानसभा सत्रानंतर आयर्न मेडनसोबत तणाव मुक्त होत आहे. खूप दिवसांनी गिटार वाजवत असल्याने काही चुका होऊ शकतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला 47 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या संगीताची आवड आणि गिटार वाजवण्याच्या कौशल्याचे कौतूक केले.