या कंपनीने बनवला अनोखा मास्क, काढल्याशिवाय करता येणार जेवण

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्कची मागणी वाढल्याने डिझाईनर मास्क देखील बाजारात येत आहेत. आता इस्त्रायलची कंपनी एव्हिटीपस पेटंट्स आणि इनव्हेंशन्सने एक खास प्रयोग केला आहे. कंपनीने एक हटके मास्क तयार केला आहे. या मास्कला जेवताना देखील काढण्याची गरज नाही. मास्क घालून सहज जेवण करता येईल.

मशीनशी जोडलेल्या या मास्कला रिमोटद्वारे कंट्रोल करता येईल. कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाईस ऑटोमॅटिक देखील काम करते. या मास्कमध्ये सेंसर लावलेले असतील जे हात अथवा चमचा जवळ आल्यास आपोआप मास्कला उघडतील.

मास्क बनवणाऱ्या कंपनीचे उपाध्यक्ष असफ गिटेलिस म्हणाले की, चमचा तोंडाजवळ येताच मास्क आपोआप उघडेल. मास्कला रिमोटद्वारे देखील कंट्रोल करता येईल. सध्या सर्वसामान्यांसाठी हा मास्क उपलब्ध नाही. कंपनी या महिन्यात मोठ्या प्रमाणात या मास्कचे उत्पादन सुरू करत आहे. मास्क बाजारात आल्यास सामान्य मास्कच्या तुलनेत अधिक पैसे यासाठी मोजावे लागू शकतात.

Leave a Comment