जाणून घ्या कचोरीचा इतिहास

भारतीयांना तिखट खायला खूप आवडते. यामुळेच आपल्याकडे प्रत्येक गल्लीत एक प्रसिद्ध स्ट्रीट फूडचे दुकान असते. भारतीयांचे असे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणजे कचोरी. याला देशातील प्रत्येक कोपऱ्यात खाल्ले जाते. आज आपण कचोरीच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया.

कचोरीचा इतिहास खूप जूना आहे. याचा इतिहास मारवाड्यांशी संबंधित आहे. तसे तर याचे काही पुरावे नाहीत, मात्र अनेक लोकांचे म्हणणे आहे की, याचा शोध मारवाड म्हणजेच राजस्थानमध्ये लागला आहे.

(Source)

याचे एक कारण कचोरी बनविण्याची पद्धत आहे. मारवाडी लोक मोजक्याच वस्तूंपासून जबरदस्त रेसिपी बनविण्यात पटाईत आहेत. यामुळे त्यांनीच कौथंबिर, हळद आणि बडीशेपचा वापर करून याला बनवण्याची सुरूवात केली. हे पदार्थ आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहेत.

(Source)

याचे सर्वात चांगले उदाहरण, जोधपूरची मोगर कचोरी आहे. याला कोणत्याही सीझनमध्ये सहज बनविण्यात येते. प्राचीन व्यापारी मार्ग मारवाडमधून जात असे. त्यामुळे तेथील बाजारातून कचोरी संपुर्ण देशात पसरली. आता देशातील प्रत्येक कानोकोपऱ्यात चवीने लोक कचोरी खातात.

आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.

Leave a Comment