दिव्यांगांसाठी गुगल मॅप्सचे खास फीचर

सर्च कंपनी गुगलने दिव्यांगांसाठी Accessible Places नावाचे एक खास फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे दिव्यांगाना गुगल मॅपवर व्हिलचेअरसाठी अनुकूल जागेची माहिती मिळेल. याशिवाय या फीचरद्वारे कोणत्या हॉटेलमध्ये व्हिलचेअरच्या प्रवेशाची सुविधा आहे याचीही माहिती मिळेल. सध्या या फीचरला ऑस्ट्रेलिया, जापान, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जारी करण्यात आले असून, लवकरच इतर देशांमध्ये सुध्दा हे फीचर जारी केले जाणार आहे.

गुगलचे म्हणणे आहे की, सध्या 130 मिलियन असे दिव्यांग आहेत, जे व्हिलचेअरचा वापर करतात. त्यामुळे एक्सेसेबल प्लेसेस हे फीचर उपयोगी ठरेल. याद्वारे युजर्सला घरी बसल्या बसल्यास योग्य ठिकाणांची माहिती मिळेल. हे फीचर तयार करण्यासाठी 120 मिलियन लोकल गाईड्सने मदत केली आहे.

या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला गुगल मॅप्स सेटिंग्समध्ये जावे लागेल. यानंतर Accessibility पर्यायावर जाऊन Accessible Places निवडावे लागेल. हे फीचर सुरू केल्यानंतर युजर्सला व्हिलचेअरसाठी योग्य ठिकाणांची माहिती मिळेल.

Leave a Comment