या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगभरातील देश करत आहेत कोरोनावर मात

कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत असून, यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीला रोखण्यासाठी जगभरात सोशल डिस्टेंसिंगपासून ते लॉकडाऊन घोषित केले जात आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जात आहे. कोरोनाच्या लढाईत महत्त्वपुर्ण ठरलेल्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

आर्टिफिशियल इंटेलिजेंस –

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देश आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेत आहेत. या तंत्रज्ञानामुळे संक्रमित व्यक्तीला ट्रॅक करणे सोपे आहे. आता फ्रान्सप्रमाणे भारत देखील आर्टिफिशियल इंटेलिजेंस सर्विलांसद्वारे लोकांवर लक्ष ठेवत आहे. सध्या हे तंत्र केवळ तेलंगानामध्ये वापरले जात आहे.

Image Credited – Amarujala

मोबाईल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग –

जगभरात कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्साठी मोबाईल कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे तंत्र जीपीएसच्या ऐवजी ब्लूटूथवर काम करते. यामुळे डिव्हाईसच्या बॅटरीवर दबाव येत नाही. अ‍ॅपल आणि गुगलने एक्सपोजर नॉटिफिकेशन एपीआय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लाँच केले होते.  याद्वारे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येताच युजर्सला नॉटिफिकेशन येते.

Image Credited – Amarujala

रोबॉट –

कोरोना व्हायरसपासून सुरक्षेसाठी जगभरात मेडिकल कर्मचारी आणि डॉक्टर्स सुरक्षेसाठी रोबॉटचा वापर करत आहे. यात डिलिव्हरी रोबॉट, तापमान तपासणारे रोबॉट आणि साफ-सफाई करणाऱ्या रोबॉटचा समावेश आहे. मागील महिन्यातच रोबोटिक्स ब्रँड मिलाग्रोने दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये आधुनिक एआय-पॉवर्ड रोबॉट मिलाग्रो आयमॅप 9 आणि ह्युमनॉइड ईएलएफ रोबॉट लावण्याची घोषणा केली होती.

Image Credited – Amarujala

विविध प्रकारचे डिव्हाईस –

जगभरातील देश आपआपल्या स्तरावर व्हायरसचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. हाँग-काँगमध्ये रिस्टबँड, दक्षिण कोरियामध्ये सीसीटिव्ही आणि इंग्लंडमध्ये वायटलपॅचचा उपयोग केला जात आहे. या डिव्हाईसद्वारे लोकांना ट्रॅक करणे सोपे आहे. सोबतच युजर्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहे की नाही याचीही माहिती मिळते.

Leave a Comment