चीनमध्ये आता नाही आहेत कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच पहिल्यांदाच 22 मे रोजी चीनमध्ये एकही नवीन कोरोनाग्रस्त न सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनसाठी ही नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, आदल्या दिवशी 4 नवीन कोरोनाग्रस्त आढळले होते. लक्षण असलेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसाला 35 वरून घटून 28 वर आला आहे.

चीनने मार्च महिन्यात नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर कठोर निर्बंध लादल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा एकदम कमी झाला होता. या निर्बंधामुळेच देशातील अनेक भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यश आले.  मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा आकडा पुन्हा वाढत आहे. मागील काही आठवड्यात जिलीन आणि हीलॉन्जियांग या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर वुहान शहरामध्ये 8 एप्रिलला लॉकडाऊन समाप्त केल्यानंतर या महिन्यातच पहिल्यांदाच अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment